जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Feb 07, 2023 | 3:30 PM

राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. संभाजीराजे छत्रपती यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत पाहा...

राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

Published on: Feb 07, 2023 03:30 PM
बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीवर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अदानी आणि नरेंद्र मोदींचे फोटो दाखवत राहुल गांधींनी विचारलं, ये रिश्ता क्या कहलाता है?