मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री खोक्यांसकट पुण्यात ठाण मांडून होते, पण तरिही पराजयच!; संजय राऊत यांचा घणाघात
kasba peth Assembly Election : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल काहीवेळाआधी समोर आला आहे. यात काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी 11 हजार 40 मताधिक्याने विजय खेचून आणला. त्यांच्या विजयावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. पाहा...
कोल्हापूर : शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय. पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोके घेऊन ठाण मांडून होते. कोकणातूनही काही लोक त्यासाठी आले होते. संपूर्ण पोलीस प्रशासन त्यात काम करत होती. पण तरिही विजय अखेर सत्याचाच झाला.रविंद्र धंगेकर यांचं अभिनंदन, असं संजय राऊत म्हणालेत. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आगामी महानगरपालिका निवडणूक लढवू आणि जिंकू सुद्धा. तोपर्यंत शिंदे गट टिकला तरी त्यांचा निभाव लागणार नाही, असंही राऊत म्हणालेत. ते कोल्हापुरात बोलत होते.
Published on: Mar 02, 2023 12:49 PM