Shirdi – Kolhapur | शिर्डी-कोल्हापूर तीर्थक्षेत्र विमानसेवेनं जोडलं जाणार-tv9
कोल्हापुरातून शिर्डी हे तीर्थक्षेत्र हवाई मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव राज्य आणि केंद्राकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.
कोल्हापुरातून तिरुपती आणि हैदराबाद ही विमानसेवा सुरळीत सुरू आहे. तर त्याचा अधिक विस्तार व्हावा यासाठी राज्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेले शिर्डीही कोल्हापुरशी जोडले जाणार आहे. आता कोल्हापुरातून शिर्डी हे तीर्थक्षेत्र हवाई मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव राज्य आणि केंद्राकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘उडान अंतर्गत राज्यातील चार विमानतळे सक्षमपणे सुरू झाली आहेत. त्यातंर्गत कोल्हापुरातून शिर्डी हे तीर्थक्षेत्र हवाई मार्गाने जोडले जावे अशी ही मागणी होत होती. त्यामुळे हा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर शिर्डी-कोल्हापूर तीर्थक्षेत्र विमानसेवेनं जोडल्यास तीर्थक्षेत्र विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
Published on: Aug 23, 2022 10:03 AM