लाखो माशांच्या मृत्यूप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; स्वप्नपूर्ती डिसलरी प्रकल्पावर बंदी
प्रदूषण नियंत्रण मंडळाने दत्त इंडिया कारखाना बंद का करु नये? वीज का कापू नये? अशी विचारणा केली होती. तर सांगली महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल का करु नये याबाबतही नोटीस काढली होती
सांगली : कृष्णा नदीत दत्त इंडिया साखर कारखान्याचे सांडपाणी शेरीनाल्यातून मिसळल्याने लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला होता. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होत सांगली महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर मृत मासे फेकले होते. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने दत्त इंडिया कारखाना बंद का करु नये? वीज का कापू नये? अशी विचारणा केली होती. तर सांगली महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल का करु नये याबाबतही नोटीस काढली होती. याचबाबतीत आज दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होईल. याच्याआधी कृष्णा नदीमध्ये रसायनिकचा पाणी सोडून माशांच्या मृत्यू प्रकरणी वसंतदादा साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिसलरी प्रकल्पावर बंदी घालण्यात आलेली आहे
Published on: Mar 13, 2023 11:50 AM