कुकडीच्या पाण्यावरून भाजप नेता रोहित पवार यांच्यावर बरसला; म्हणाला, ‘फक्त सोशल मीडियावर’
रोहित पवारांनी माझा फोटो कट करून 22 तारखेला पाणी सोडणार असं म्हटलं होतं. मात्र पाणी आलचं नाही. मग आता त्यावर का बोलत नाही. ते राहतात पुण्यात, पुण्याच्या लोकांचं लांगुलचालन करतात आणि मतदारसंघातील लोकांना वेठीस धरतात.
पुणे : कुकडीच्या पाण्यावरून भाजप नेते राम शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार फक्त सोशल मीडियावर असतात. रोहित पवारांनी माझा फोटो कट करून 22 तारखेला पाणी सोडणार असं म्हटलं होतं. मात्र पाणी आलचं नाही. मग आता त्यावर का बोलत नाही. ते राहतात पुण्यात, पुण्याच्या लोकांचं लांगुलचालन करतात आणि मतदारसंघातील लोकांना वेठीस धरतात. त्यांच्याच पक्षातील आमदारांनी विरोध केल्यामुळे त्यांची अडचण झालीय. ते नौटंकी करताता. त्यांच्या मनात पाप आहे. रहायचं एकीकडे, निवडून आले दुसरीकडे असं ते करतात. त्यामुळं लोक तुम्हाला लक्षात ठेवतील आणि ठेवलेलं आहे असा घणाघात केला आहे.
Published on: May 24, 2023 03:08 PM