जेजुरीच्या लढ्याला यश येणार? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने दिला शिष्टमंडळाला पाठिंबा, म्हणाला..
खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या. मात्र यात काही निवडी या बाहेरच्या तर राजकीय हस्तेक्षेपातून करण्यात आल्याचा आरोप जेजुरीच्या शिष्टमंडळाने केला आहे.
बारामती : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद चिघळला आहे. खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्वस्तांच्या निवडी झाल्या. मात्र यात काही निवडी या बाहेरच्या तर राजकीय हस्तेक्षेपातून करण्यात आल्याचा आरोप जेजुरीच्या शिष्टमंडळाने केला आहे. तर यावरून ग्रामस्थ गेल्या तीन दिवसांपासून आंदोलंन करत आहेत. यावरून जेजुरीच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. तसेच आपले म्हणणे त्यांना सांगितलं. त्यावरून अजित पवार यांनी शिष्टमंडळाच्या या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे सांगत मी आपल्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता जेजुरीच्या शिष्टमंडळाने सुरू केलेल्या या लढ्याला अधिकधार येणार असून त्या निवडी आता मागे घेतल्या जातात का हे पहावं लागेल. तर उद्या पुण्यात यावरून मोर्चा काढण्यात येणार असून यात महिलाही सहभागी होणार. तर न्याय मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार असल्याचा निर्धार जेजुरीच्या शिष्टमंडळाने केला आहे.