शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर आले, तर काय होईल? पाहा कुमार सप्तर्षी यांनी काय केली मागणी…

| Updated on: Jul 31, 2023 | 1:47 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यांना उद्या पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही याच व्यासपीठावर असणार आहेत. पण शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहू नये, असं कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांना सांगितलं आहे.

पुणे, 31 जुलै 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही याच व्यासपीठावर असणार आहेत. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळावं, असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. “शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहू नये. तुम्ही जर उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर देशात वेगळा संदेश जाईल,” असं कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांना सांगितलं आहे.

 

Published on: Jul 31, 2023 01:47 PM
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत संतापाची लाट; काँग्रेसचे जोरदार आंदोलन
गाडी वांद्रे-वरळी सी लिंकवर पार्क करून एकाने थेट मारली समुद्रात उडी; वरळी पोलीसांनी घटनास्थळी धाव