Gulabrao Patil : तुमचं आमचं सेम-सेम; अजितदादांच्या ‘त्या’ व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी

| Updated on: Mar 25, 2025 | 6:07 PM

Gulabrao Patil Reaction On Ajit Pawar Video : कुणाल कामरा याने शिंदेंना गद्दार म्हंटल्यानंतर आता अजित पवारांचा देखील जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कॉमेडीयन कुणाल कामरा याने शिंदेंना गद्दार म्हंटल्यानंतर आता अजित पवारांचा देखील जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर शिंदेंच्या मंत्र्यांना विचारणा झाल्यावर गुलाबराव पाटील यांनी थेटपणे त्यावर बोलण्याऐवजी ‘अजित पवारांना देखील गद्दार म्हंटलं गेलं. त्यामुळे आम्ही सेम-सेम आहे,’ असं उत्तर दिलं आहे. दरम्यान, शिवसेना सोडल्यानंतर जे अजित पवार म्हणत होते तेव्हा आपण म्हंटलं आहे, असं कुणाल कामरा याने म्हंटलं आहे.

अजित पवार यांचा जुना व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात, ‘गद्दारी करून 50 खोके एकदम ओके. शेमड्या पोरांना सुद्धा आता 50 खोके कळायला लागले आहेत. सायरन वाजला की लोक म्हणतात ते 50 खोकेवाला चालला आहे. ते गद्दार चालला आहे. असं मी म्हणत नाही, लोक म्हणतात.’ असं अजित पवार आपल्या भाषणात बोलताना दिसत आहेत. त्यावर गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं की, कुणाल कामरा याने काहीही म्हंटलं तरी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अशी टीका करणं योग्य नाही. अजित पवारांवर सुद्धा गद्दार म्हणून टीका झाली आहे. म्हणजे तुमचं आमचं सेम सेम, असं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं.

Published on: Mar 25, 2025 06:07 PM
‘…तसा अंगावर शाल घेऊन एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय’, परबांची राणेंवर नाव न घेता टीका; ठाकरेंही गालातल्या गालात हसले
Prashant Koratkar Case : कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले