Kunal Kamra Controversy : युनी कॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड; शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट
Kunal Kamra Controversy On Shivsena Song : कुणाल कामरा याने शिंदे सेनेवर केलेल्या वादग्रस्त गाण्यानंतर शिवसैनिकांनी खारमध्ये असलेला कामराचा स्टुडिओ काल फोडला होता. त्यानंतर पोलिसांनी या शिवसेना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.
एकीकडे कॉमेडीयन कुणाल कामराचा वाद सुरू असताना दुसरेकडे कुणाल कामराचा स्टुडिओ फोडणाऱ्या शिवसैनिकांना खार पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं समोर आलं आहे. खार पोलीस ठाण्यात आता जेवणाचं पार्सल आणि पाण्याच्या बाटल्या आल्याचं देखील समोर आलं आहे.
11 शिवसैनिकांना खार येथील युनी कॉन्टीनेन्टल हॉटेलच्या तोंडफोडी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये राहुल कनाल, कुणाल सरमळकर हे सुद्धा आरोपी आहेत. कुणाल कामराच्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर त्यांनी ही तोडफोड केली होती. मात्र आता या सगळ्या शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट मिळतांना दिसत आहे. त्यांच्यासाठी जेवणाचे पार्सल आणि पाण्याच्या बाटल्या खार पोलीस ठाण्यात आलेल्या आहेत.
Published on: Mar 24, 2025 01:44 PM