आजारी असतानाही ताई मतदारसंघात कार्यक्रम सक्रीय, त्यांच्या कामाचा तरी मान ठेवा; मुक्ता टिळक यांचे चिरंजीव नाराज

| Updated on: Mar 29, 2023 | 11:34 AM

Kunal Tilak on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर टिळक कुटुंबात नाराजी पाहायला मिळतेय. भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पाहा व्हीडिओ...

पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक नाराज आहेत. आपल्या मनातील खदखद त्यांनी बोलून दाखवली आहे. “पुण्यात पक्ष कुठे नसताना पक्ष वाढवण्यासाठी मुक्ताताई फिरल्या. त्यांच्या कामाचा मान त्यांनी राखायला हवा होता, असं कुणाल टिळक म्हणाले आहेत. आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याशी सहमत नाही. त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. त्यांना कोण चुकीची माहिती देतं आहे असा प्रश्न मला पडला आहे. मुक्ता टिळकांचं काम होतं. त्यामुळे लोक त्यांना मानत होते. त्यांच्यासाठी सहानुभूतीची लाट होती. मुक्ताताई आजारी असतानाही त्या मतदारसंघात कार्यक्रम घेत होत्या. 20 ते 25 वर्षे त्यांनी पक्षासाठी काम केलं. त्या कामामुळे त्यांचा जनसंपर्क होता, असंही कुणाील टिळक म्हणालेत.

अयोध्येतील राममंदिरासाठी चंद्रपूरातील आल्लापल्लीतील सागवान
घोड्यावरून संजय राऊत यांचा कोणाला टोला? म्हणाले, ताकद विसरला