‘…यानंतर लाडकी बहीण योजना बंद होईल..,’ ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
भविष्यात महाराष्ट्राच्या खर्चाचा डोलारा सांभाळणे कठीण होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा खर्चामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होण्याचे वांदे झाले आहेत, त्यामुळे ही योजना फार काळ चालविणे सरकारला जड जाणार असल्याचेही या नेत्याने म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्याचे आदेश नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता महाराष्ट्रातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना वेतन देताना अडचणी येत असल्याने लाडकी बहीण योजना फार काळ चालणार नाही असे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केले आहे. ते पुढे म्हणाल की महाराष्ट्र कर्जामध्ये बुडालेला आहे, त्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं मोठे आव्हान अजितदादा कसे पेलणार हा प्रश्नच आहे, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजना ते सुरु ठेवतील. त्यानंतर ही योजना बंद पाडतील, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे. या योजनेमुळे महाराष्ट्राचा डोलारा सांभाळणे जिकरीचे काम असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की ‘लाडकी बहीण योजना’ सरकार बंद करेल असेही ते म्हणाले आहेत.