Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प

| Updated on: Apr 08, 2025 | 9:58 AM

Ladki Bahin Yojana Verification : लाडकी बहीण योजनेच्या पात्र आणि अपात्र लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यात येणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. मात्र ही पडताळणी प्रक्रिया सध्या ठप्प पडलेली बघायला मिळत आहे.

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजना मानले जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेची पडताळणी आता ठप्प पडलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. यात महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेच्या पात्रतेच्या अटीत न बसणाऱ्या महिलांकडून देखील योजनेचा लाभ घेतला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारकडून पात्र अर्जांची पडताळणी केली जाणार असल्याचं सरकारकडून जानेवारी महिन्यात सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अर्ज पडताळणीला सुरुवात देखील करण्यात आली होती. यात अनेक महिला अपात्र ठरल्याने त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं होतं. त्यानंतर मात्र सध्या ही पात्रता पडताळणी ठप्प पडलेली बघायला मिळत आहे.

Published on: Apr 08, 2025 09:58 AM
MLA Residence Mumbai : साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
Indian Tigers And Tigresses : टीव्ही 9 नेटवर्कच्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडून कौतुक