ताम्हिणी घाटात गेल्या 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, दरड कोसळ्याने ट्रॅफीक जाम, पश्चिम घाटात अतिवृष्टी
पुण्यातील मुळशी, खडकवासला धरण क्षेत्रात आठ इंचाचा पाऊस पडला आहे. इंद्रायणी नदीला पुर आल्याने पुण्याची स्थिती बिकट झाली आहे. पुण्यातील नुकसानग्रस्त भागाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरा केला आहे.
पश्चिम घाटात प्रचंड पाऊस झाला आहे. ताम्हिणी घाटात तर गेल्या 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस झाला असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आला आहे. ताम्हिणी घाटात रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आली आहे. त्यामुळे येथील रस्ता दुरुस्तीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे अनेक भाजीवाले ट्रक चालक, रुग्ण अडकून पडले आहेत. आधारवडी गावात दरड कोसळल्याने ट्रॅफीक जाम झाले आहे. पर्यटकांना पुण्याला रिर्व्हस जायला सांगावे अशी विनंती नागरिकांनी केली आहे. रस्त्यावरील माती हटविण्यासाठी किमान काही तास लागण्याची शक्यता आहे. पुण्यातील मुळशी, खडकवासाला धरण संपूर्ण भरले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने तुळशी, तानसा, विहार या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.खडकवासला धरण क्षेत्रात आठ इंचाचा पाऊस पडला आहे.