मुंबईतील अंधेरी परिसरात दरड कोसळली; इमारतींच्या घरांमध्ये मातीचा ढिगारा
मुंबईतील अंधेरी पूर्व चकला परिसरातील रामबाग सोसायटीत दगड कोसळल्याने 4 ते 5 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसानंतर दगड कोसळली आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | मुंबईतील अंधेरी पूर्व चकला परिसरातील रामबाग सोसायटीत दगड कोसळल्याने 4 ते 5 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसानंतर दगड कोसळली आहे. या दुर्घटनेत 5 घरांचं नुकसान झालं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या घटनेत कोणीही जखमी नाही झालेलं नाही.सध्या अग्निशमन दलाचे पथक रामबाग सोसायटीत पोहोचले असून घरातील मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. ही घटना जर दिवसाढवळ्या घडली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेनंतर रामबाग सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Published on: Jul 25, 2023 10:59 AM