Aurangabad मध्ये Raj Thackeray यांच्या सभेसाठी 2 हजार पोलीसांचा मोठा फौजफाटा
आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यानाच लागली आहे. राज यांनी आजच्या सभेतून राज्याला पुढे नेण्याचा, जातीय सलोखा टिकवण्याचा विचार द्यायला हवा.
आज राज ठाकरेंची सभा होणार असल्याने औरंगाबादमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जमावबंदी लागू असल्याने अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टी लक्ष ठेवलं जात आहे. दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. राज ठाकरेंच्या आजच्या सभेला अतिप्रचंड गर्दी होईल. सभेला आज मोठ्या प्रमाणात लोक येतील. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यानाच लागली आहे. राज यांनी आजच्या सभेतून राज्याला पुढे नेण्याचा, जातीय सलोखा टिकवण्याचा विचार द्यायला हवा. राज्य सरकारला काही सूचना करायच्या असतील तर अवश्य कराव्या. मात्र जातीय तेढ, द्वेष वाढवू नका असं आवाहनही वडेट्टीवार यांनी केलं आहे.