लता मंगेशकर महान आत्मा, त्यांच्या स्मारकावरुन राजकारण नको – संजय राऊत

| Updated on: Feb 07, 2022 | 1:24 PM

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकाचा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार राम कदम (ram kadam) यांनी शिवाजी पार्कातच लता मंगेशकर यांचं स्मृती स्थळ उभारण्याची मागणी केली आहे. राम कदम यांनी त्याबाबतचं पत्रंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)  यांना लिहिलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लतादीदींच्या स्मारकाबाबत राजकारण करू नये. लतादीदी या महान व्यक्तिमत्व होत्या. त्यांचं स्मारक उभारणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी केंद्र सरकारनेच विचार केला पाहिजे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.

Published on: Feb 07, 2022 01:24 PM
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 7 February 2022