पुणे-बारामतीचं काय? कोणत्या मागणीनं राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये कलह

| Updated on: Apr 30, 2023 | 2:00 PM

काँग्रेसने पलटवार करताना बारामती काँग्रेसला देणार का, असा सवाल काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केला आहे.

मुंबई : दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभाची (Pune Lok Sabha) जागा रिक्त झाली. त्या जागेसाठी अजून पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. तोच जागोवरून दावे करण्याचे काम राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. भाजप, महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) यासाठी रणनिती आखली जात आहे. मात्र याच्याआधीच महाविकास आघाडितील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमधला कलह आता उघड होत आहे. ही जागा काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress) त्यावर दावा केला आहे. तर ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला द्यावी अशी मागणी केली आहे. त्यावर काँग्रेसने पलटवार करताना बारामती काँग्रेसला देणार का, असा सवाल काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत पोटनिवडणुकीवरुन बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Published on: Apr 30, 2023 02:00 PM
बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान राडा, पोलीस आणि कार्यकर्ते कुठं भिडले?
राष्ट्रवादीत नेत्यांचे दोन गट; ‘या’ दोन नेत्याचं नाव घेत बच्चू कडू यांचा राष्ट्रवादीवर निशाणा