…म्हणून तुम्ही मराठा होऊच शकत नाही; ठाकरे गटाच्या नेत्याने गुलाबराव पाटील यांना फटकारलं
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी करण्यामागचं कारण सांगितलं. त्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. पाहा...
लातूर : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी करण्यामागचं कारण सांगितलं. “एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.”गुलाबराव पाटील, मराठ्यांचं नाव बदनाम करू नका. गद्दारांचं नाव इतिहासात लिहिलं जात नाही. तर निष्ठावंताचं नाव इतिहासात लिहिलं जातं. मराठा ही जात नाही तर वृत्ती आहे. गद्दारी करणारे मराठा होऊ शकत नाहीत. म्हणून तुम्हीही मराठा होऊ शकत नाही”, असं अंबादास दानवे म्हणालेत.
Published on: Feb 25, 2023 02:58 PM