कृषी पदवीधर सेलच्या अधिवेशनासाठी शरद पवार अमरावतीत

| Updated on: Apr 23, 2023 | 9:57 AM

शरद पवार हे अमरावती येथील रहाटगाव फाटा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस कृषी पदवीधर सेलच्या अधिवेशनात सहभागी होणार आहेत

मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार या वावडीनंतर तर उद्योगपती गौतमी अदानी भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे चर्चेत होते. ते आता अमरावती दौऱ्यावर जात असून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. शरद पवार हे अमरावती येथील रहाटगाव फाटा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस कृषी पदवीधर सेलच्या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख जाणार असल्याची चर्चा आहे. तर शरद पवार हे 21 दिवसांनंतर दुसऱ्यांदा विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Apr 23, 2023 09:57 AM
जळगावात राऊत गुलाबराव पाटील आमने-सामने, सभेआधीच शब्दांचा सामना रंगला
उद्धव ठाकरे यांची जळगावात तोफ धडाडणार ! तगडा पोलीस बंदोबस्त अन् डॉग स्क्वॉडकडून सभास्थळाची पाहणी