भाजप नेत्यांकडून शरद पवार यांचा एकेरी उल्लेख, अजित पवार म्हणाले, ‘जसे संस्कार…’

| Updated on: Jun 06, 2023 | 7:23 AM

आधी फक्त भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार यांच्यावर उल्लेख करत टीका करत होते. त्यात आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही भर पडली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

पुणे : गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला जात आहे. आधी फक्त भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार यांच्यावर उल्लेख करत टीका करत होते. त्यात आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही भर पडली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. संस्कार होतील, तसेच ते बोलणार आणि वागणार असे म्हणत अजित पवारांनी मुनगंटीवार आणि पडळकर यांच्यावर निशाणा साधला. तर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण, दुसऱ्यांकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्यावर बोलू शकत नाही,” असे म्हणत अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांचा नामोल्लेख करणं टाळलं आहे.

Published on: Jun 06, 2023 07:23 AM
जेजुरी विश्वस्त निवडीचा वाद चिघळला! ग्रामस्थ आंदोलनकर्ते हायकोर्टात जाणार
बीडच्या तरुणाकडून थेट लग्नाची मागणी अन् गौतमी पाटील स्पष्टच बोलली…