राष्ट्रवादीचं नाव घेताच अजित पवार भडकले; म्हणाले, जरा…

| Updated on: Mar 14, 2023 | 1:40 PM

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी जुनी पेन्शन मागील सरकारमधील लोकांनीच बंद केल्याचाही आरोपवरून पत्रकारांनी विचारले असता ते भडकलेच

मुंबई : राज्यात जुन्या पेन्शनचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत राजव्यापी संप पुकारला आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करत जुनी पेन्शन मागणीला पाठबळ दिलं आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी जुनी पेन्शन मागील सरकारमधील लोकांनीच बंद केल्याचाही आरोपवरून पत्रकारांनी विचारले असता ते भडकलेच. तर अरे जरा माहिती घेत जा, पत्रकार मित्रांना सगळी माहिती नसते. त्यामुळे कुणाचीही नावं घेतात आणि काहीही करतात, असंही ते म्हणाले. २००५ ला देशपातळीवर देशात आणि राज्यात ही योजना बंद करताना करार झाला. त्यावेळी कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे जे कामगार नेते होते त्यांच्याशी चर्चा करून हा मार्ग निघाला, अशी माझी माहिती आहे. पहा अजित पवार काय म्हणाले…

Published on: Mar 14, 2023 01:39 PM
सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा; अरविंद सावंत यांच्याकडून अपेक्षा व्यक्त
राज्यातील सत्तासंघाबाबत हरीश साळवे यांची मोठी मागणी; पाहा काय म्हणालेत…