‘…पण 54 % जनता ही विरोधातच, तुमचाच सर्वे सांगतो’; ठाकरे गटाच्या नेत्याची खरमरीत टीका
धक्कादायक बाब म्हणजे येथे देवेंद्र फडणवीस यांनी पसंती मिळाली नसल्याचा दावा शिवसेनेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आला आहे. तर राज्यातील 49 टक्के जनतेनं शिंदे फडणवीस जोडीला पसंती दिल्याचा दावा देखील या जाहिरातीतून करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वेक्षण झाले. मुख्यमंत्रिपदासाठी अव्वल पसंती एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे येथे देवेंद्र फडणवीस यांनी पसंती मिळाली नसल्याचा दावा शिवसेनेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आला आहे. तर राज्यातील 49 टक्के जनतेनं शिंदे फडणवीस जोडीला पसंती दिल्याचा दावा देखील या जाहिरातीतून करण्यात आला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राजकारणात दोन आणि दोन चार होत नसतं. तर कधी कधी दोन-दोन सहा पण होतात. तर कधी कधी दोन आणि दोन दोनच राहतात अशी टीका केली आहे. त्यांनी या सर्वेक्षणावरून शिंदे गटासह भाजपवर निशाना साधताना, जसं महाराष्ट्रातील जनता भाजप शिवसेनेला 46 टक्के मत त्यांच्या बाजूनं दिल्याचे हे सांगत आहेत. त्याचबरोबर राज्यातील 54 % जनता ही त्यांच्या विरोधात असल्याचं येथे सिद्ध होतं. म्हणून तुमची ही जाहिरात खोटी आहे. जनतेच्या मनात धूळ फेकणारी आहे. आपलं हे सर्वेक्षणच तुमच्या विरोधात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.