Ambadas Danve : एमआयएमच्या या अंदोलनात जे सहभागी झालेत त्यांचा औरंगजेब कोण होता? असं अंबादास दानवे का म्हणाले?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत त्यांचे संसदेचं सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली आहे
छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपुर्वीच औरंगाबादचं नामांतर करण्यात आलं. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामातंरण झाले. त्यानंतर आता त्याला एमआयएमने विरोध केला आहे. त्याचबरोबर एमआयएमच्या वतीने या विरोधात साखळी उपोषण केले जात आहे. यावरूनच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत त्यांचे संसदेचं सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्या एमआयएमने विरोध करण्यासह उपोषण सुरू केलं आहे. याचदरम्यान उपोषणाच्या मंडपातच उपोषणकर्त्यांनी बिर्याणीवर ताव मारल्याने हे उपोषण म्हणजे नाटक असल्याचे दानवे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर खासदार इम्तियाज जलील यांचे संसदेचं सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली आहे. तर कोणासाठी हे उपोषण करत आहेत. औरंगजेब हा त्यांचा कोण होता आधी हेही स्पष्ट करावे असेही त्यांनी म्हटलं आहे.