विरोधक सोमय्या यांच्यावरून आक्रमक; विरोधी पक्ष नेत्यांनी केली थेट ‘ही’ मागणी

| Updated on: Jul 19, 2023 | 11:45 AM

याच्याआधी महिला अत्याचार, शेतकऱ्यांचा प्रश्नावरून विरोधकांनी दोन दिवस सभागृहात आणि सभागृहाबाहेर गोंधळ झाला. मात्र काल भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अपेक्षाहार्य व्हिडिओ व्हायरल झाला.

मुंबई, 19 जुलै 2023 | राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आज तिसरा दिवस सुरू झालेला आहे. याच्याआधी महिला अत्याचार, शेतकऱ्यांचा प्रश्नावरून विरोधकांनी दोन दिवस सभागृहात आणि सभागृहाबाहेर गोंधळ झाला. मात्र काल भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अपेक्षाहार्य व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरूनही विरोधक सोमय्या प्रकरणावरून आक्रमक होत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी आग्रही भूमिका लावून धरली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनापूर्वी पुन्हा एकदा या प्रकरणावरून जोरदार हल्ला चढवला आहे. दानवे यांनी यावरून भाजपवर टीका करताना, फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत त्या पद्धतीने पोलीस चौकशी करतीलच. मात्र सुसंस्कृती म्हणणारा भाजप आता कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. तर भाजपने सोमय्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच याच्याआधीच याप्रकरणी आपण उपसभापतींकडे पुरावे दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या तिसऱ्या दिवशीही हा मुद्दा चांगलाचा गाजवण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 19, 2023 11:45 AM
किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु…
पंतप्रधान मोदी यांच्या शेजारी 70 हजार कोटींचा घोटाळा आणि इक्बाल मिर्ची; संजय राऊत यांची टीका