‘पावसाळी अधिवेशनात सरकारला खिंडीत आडविण्यासाठी अनेक मुद्दे’; अंबादास दानवे यांचा इशारा
विरोधी पक्ष नेता अजित पवार हेच सत्तेत गेल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांकडून पावसाळी अधिवेशनात सरकारची आडवणूक कशी आणि कोण करणार असा सवाल उभा होत आहे.
मुंबई | 16 जुलै 2013 : राज्याच्या राजकारला कलाटणी देणारी घटना काहीच दिवसांपुर्वी घडली असून विरोधकांचा आवाज असणारा विरोधी पक्ष नेता अजित पवार हेच सत्तेत गेल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून विरोधकांकडून पावसाळी अधिवेशनात सरकारची आडवणूक कशी आणि कोण करणार असा सवाल उभा होत आहे. तर पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज बैठक होणार आहे. या बैठकीबाबत विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, यावेळी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला इशारा देताना, सरकारला घेरण्यासाठी आमच्याकडे अनेक प्रश्न असून मोजायचे झाल्यास त्यांना आकडे मोजत बसावं लागतील इतके प्रश्न आमच्याकडे आहेत. तर आम्ही ते विचारून सरकारला सळो की पळो करून सोडू . सरकारला धारेवर धरू हे निश्चित असं दानवे यांनी म्हटलं आहे. तर अजित पवार यांचा गटच आता सत्तेत गेल्याने विरोधकांचा आवाज पोहचणार का या प्रश्नावर त्यांनी, हा लढा आत्मविश्वासाने लढला जातो संख्येने नाही. इतिहासात त्याचे दाखले आहेत. वेडात मराठे वीर दौडले सात याप्रमाणे आम्ही हा लढा देऊ आणि जिंकूही असा विश्वास त्यांनी दाखवला आहे.