VIDEO | ‘आनंदाचा शिधा सरकारच्या आनंदासाठी’; वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाना

| Updated on: Aug 19, 2023 | 11:17 AM

महाराष्ट्र सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी गौरी गणपतीच्या वेळेस ही शिधा देण्यात येणार आहे. मात्र याच्या आधी दिवाळीत हा प्रयत्न फसला होता. त्यावरून आता विरोधी पक्ष नेते यांनी टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | गौरी गणपतीच्या वेळेस जनसामान्यांना आनंदाचा शिधा देण्याचा मानस सरकारचा आहे. याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल करत टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी, आनंदाचा शिधा हे सगळं बोगसबाजी आहे. ठरलेल्या चार लोकांचं पोट भरण्यासाठीच मंत्र्यांसह त्या खात्याने हा उचललेला नवीन धंदा आहे. आम्ही त्याची चिरफाड करू. केवळ दोन तीन लोकांनाच हे पाच सहाशे कोटी रुपयाचं काम द्यायचं हा घाट आहे. तर शंभर रुपयाचा शिधा म्हणून गरिबाला दाखवायचं आणि शासनाची तिजोरी लुटायचं. हा धंदा इथे सुरू आहे. आनंदाचा शिधा हा सामान्यांना आनंद देणारा नाही. एक किलो डाळ, एक किलो साखर आणि किलो तेलानं काय जीवनात आनंद येतो का? असा खरमरित सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर १४०० रूपयेच्या सिलिंडरवर ५०० रूपये सबसिडी दिली असती तर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला असता. पण हे केलेलं नाही असा टोला लगावला आहे.

Published on: Aug 19, 2023 11:17 AM
VIDEO | मुख्य खुर्चीच बदलणार? वडेट्टीवार यांनी थेट खुर्ची बदलाची डेड लाईनच सांगून टाकली
VIDEO | ‘फडणवीस याचे सत्य वाक्य तुम्हाला अन तुमच्या घरबश्याला झोबलं…’; भाजप नेत्याचा सामनाच्या टीकेला पलटवार