मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार – वडेट्टीवार संतापले
रविवार रात्रीपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात साचलेलं , घरात शिरलेलं पाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले. सतत धावणारी मुंबई पावसामुळे ठप्प झालू असून याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.
रविवार रात्रीपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात साचलेलं , घरात शिरलेलं पाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले. तर रेल्वे ट्रॅक्सवरही पाणी आल्यामुळे मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकलसेवा ठप्प झाल्याने कामावर निघालेले लोक मध्येच अडकले. स्टेशनवर, बसमध्ये तोबा गर्दी झाला, वाहतूक कोंडीही दिसत आहे. सतत धावणारी मुंबई पावसामुळे ठप्प झालू असून याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. आज मुंबईची जी दुरावस्था झाली आहे, त्यासाठी आत्ताचे सत्ताधारी आणि मुंबईच प्रशासन कारणीभूत आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या सरकारला व्यवस्थापनच जमत नाही ना. जर पावसामुळे राज्याचे मंत्रीच अडकत असतील तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील ? अपयशी सरकार अशी या सरकारची ओळख निर्माण झालेली आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.