आशिष शेलार यांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाला, ‘कोकणवासियांना देशोधडीला…’
बारसू रिफायनरीवरूनही काही दिवसापासून भाजप-ठाकरे गट आमने-सामने आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.
मुंबई, 29 जुलै 2023 | कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं होतं. बारसू रिफायनरीवरूनही काही दिवसापासून भाजप-ठाकरे गट आमने-सामने आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. यावेळी शेलार यांनी, भारतातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प ठाकरे गटाने विरोध केल्याने पाकिस्तानला गेला. तर या प्रकल्पाला विरोध करून ठाकरे गटाने सरळ पाकिस्तानला मदत केली का? असा सवाल केला होता. त्यावरून ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, जे प्रकल्प गुजरातला गेलेत ते महाराष्ट्राला परत द्या आणि नानार, बारसू सारखे प्रकल्प गुजरातला न्या असा टोला लागवला आहे. तसेच जर ठाकरे यांच्यामुळे एखादा प्रकल्प जर पाकिस्तानला जात असेल तर शेलार यांनी याची नोंद घ्यायला हवी असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.