Lok Sabha elections : ‘पक्षाने आदेश दिल्यास निवडणूकच काय? तर तुरुंगातही जाईन’; राऊत याचं मोठं वक्तव्य
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आगामी लोकसभेवरून मोठी घोषणा केली आहे. तर त्यांनी याचबरोबर पक्षाने आदेश दिल्यास आपण तुरुंगातही जाऊ असे म्हटलं आहे त्यामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
मुंबई : 21 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. जसजसे निवडणुकीचे पडघम वाजू लागतील तसे अनेक नेते लोकसभेच्या जागेवरून आणि निवडणुकीवरून दावा ठोकतील. पण याच्याआधीच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील लोकसभा निवडणुकीवरून सुचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राऊत यांनी पक्षानं आदेश दिल्यास निवडणुकच काय? तर तुरुंगातही जाईन असे वक्तव्य केलं आहे. तर इतक्या वर्षानंतर राऊत हे थेट निवडणुकीला सामोरं जाणार अशी घोषणाच त्यांनी केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे. यावेळी त्यांनी, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ईशान्य मुंबईमध्ये मीच काय तर सामान्य शिवसैनिक सुद्धा दोन लाखाच्या मताधिक्यानं विजयी होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलेला आहे.
Published on: Aug 21, 2023 11:55 AM