video : बाळासाहेबांना राजकारणात अशीच खिलाडू वृत्ती अपेक्षित होती : संजय राऊत
संजय राऊत यांच्या उपस्थित नाशिकमध्ये क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन झाले. तेव्हा राऊतांनी माझा आणि तसा क्रिकेटचा संबंध नाही. पण तुम्हीही राजकीय फटकेबाजी करा असे राऊत यांनी उपस्थितांना म्हटलं
नाशिक : ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार पडताच आणि उद्धव ठाकरे यांची सभा होत असल्याने ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मैदानात उतरत जोरदार बॅटींग केली. त्यांनी बॉक्स क्रिकेट खेळल्यानंतर राजकीयही बॅटींग केली. सध्या याच बॅटींगची चर्चा सुरू आहे.
यादरम्यान संजय राऊत यांनी भाषण करत राजकीय फटकेबाजी केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना फटकेबाजी करत राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी नाशिकमधील पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते
संजय राऊत यांच्या उपस्थित नाशिकमध्ये क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन झाले. तेव्हा राऊतांनी माझा आणि तसा क्रिकेटचा संबंध नाही. पण तुम्हीही राजकीय फटकेबाजी करा असे राऊत यांनी उपस्थितांना म्हटलं
क्रिकेट खेळणारी मुलं उद्या हिचं पोरं भगवा खांद्यावर घेणार आहे, असं म्हणत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना राजकारणात येण्याचा एकप्रकारे सल्ला त्यांनी दिला आहे.
त्याचबरोबर राजकारणातून खिलाडू वृत्ती कमी होत चालली आहे अशी कबुली राऊत यांनी देत बाळासाहेबांना राजकारणात अशीच खिलाडू वृत्ती अपेक्षित होती असं म्हंटलं आहे.