शिंदे-फडणवीस बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार; राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Jan 09, 2023 | 12:37 PM

राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करून पाडले. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आणने. यानंतर उद्धव ठाकरे गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दारे ठोठावली.

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावरून शिंदे गट, उद्धव ठाकरे गटात वाद होताना दिसतात. आता सत्ता संघर्षावरूनच उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाना साधताना हल्लाबोल केला आहे. तर तारखावर तारखा पडत असल्या राज्यातील जनतेसह आम्ही न्यायालयाकडे अपेक्षेने पाहत आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करून पाडले. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आणने. यानंतर उद्धव ठाकरे गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दारे ठोठावली. त्यावर आता सुनावणी सुरू आहे.

यादरम्यान उद्याच्या होणाऱ्या सुनावणीवरून संजय राऊत यांनी, शिंदे- फडणवीस सरकार घटनाबाह्य सरकार सत्तेवर एक दिवसही राहता कामा नये, असा आदेशच कोर्टाने द्यायला हवा असे म्हटलं आहे. तर हे सरकार, बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘शिंदे गटाचा विश्वास दिल्लीतील महाशक्तीवर’ संजय राऊत यांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल
शरद पवार यांच्यावर उद्या मोठी शस्त्रक्रिया, ब्रीज कॅन्डीत होणार उपचार