जेथे धर्म तेथे जय, त्यामुळे विजय आमचाच होणार; संजय राऊत यांचा विश्वास
सत्तासंघर्षानंतर आपल्यालाच यश मिळणार, आपलीच खरी शिवसेना असल्याचे वेळोवेळो दोन्ही गटांनी सांगितलं आहे. त्यावर १४ जानेवारीला होणाऱ्या सुनावणी वर खासदार राऊत यांनी महाभारतातील एका श्लोकाची आढवण करून दिली आहे.
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्या आहेत. तर खरी शिवसेना कोणाची यावर यावर गेल्या 6 महिन्यांपासून सत्तासंघर्ष दिसून येत आहे. या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आता १४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यापुर्वी खरी शिवसेना आमची असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संयज राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली.
सत्तासंघर्षानंतर आपल्यालाच यश मिळणार, आपलीच खरी शिवसेना असल्याचे वेळोवेळो दोन्ही गटांनी सांगितलं आहे. त्यावर १४ जानेवारीला होणाऱ्या सुनावणी वर खासदार राऊत यांनी महाभारतातील एका श्लोकाची आढवण करून देत तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधिशांच्या बैठक व्यवस्थे जवळ आहेत. तो जेथे धर्म तेथे जय असे आहे. त्यामुळे आमचा विजय नक्की होईल.
ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. धर्म आमच्या बाजूने आहे. तर या देशाची घटना, लोकशाही जीवंत आहे.