नेते आले आणि गेले, पण मागण्या तशाच… पाहा, काय आहेत मनोज जरांगे यांच्या मागण्या
शरद पवार आले. उदयनराजे आले. उद्धव ठाकरे यांनीही जरांगे यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे ही येऊन गेले. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आले. मात्र, जरांगे यांची नेमकी मागणी काय आहे, हे कुणी समजूच शकले नाहीत.
जालना : 4 सप्टेंबर 2023 | जालना येथे झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्षांचे नेते अंतरवाली सराटी गावात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे जे जे नेते जरांगे यांना भेटले. त्यानंतर ते मराठा आरक्षणावरच बोलले. मात्र जरांगे यांची नेमकी मागणी काय आहे? यासंदर्भात राज ठाकरे यांनी चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे हे ‘या राजकारण्यांच्या नादाला लागू नका’ असे म्हणाले. तर, लाठीचार्जवरून सरकारवरही हल्लाबोल केला. लाठीचार्ज आणि गोळ्या मारणाऱ्यांना मराठवाडा बंदी करा असं राज ठाकरे म्हणाले. तर, तुम्ही तुम्ही विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांना केला. राज ठाकरे आणि जरांगे यांच्यात सुमारे १५ ते 20 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत जरांगे यांनी आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत ते सांगितलं. जरांगे यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? पाहू हा स्पेशल रिपोर्ट