Special Report | सरकार एक हायकमांड दोन? साताऱ्यातील ठिणगीनं राजकारण पेटवलं; गोरे यांच्या वक्तव्यावरूण रणकंदण

| Updated on: Jul 17, 2023 | 11:55 AM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यात उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत गोरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यातील सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप-शिंदे गटात चांगलीच वाजलं आहे.

मुंबई, 17 जुलै 2023 | राज्याचे अधिवेशन सुरू झालं आहे. याच्याआधीच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सध्या कोण हायकमांड यावरून वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यात उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत गोरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या राज्यातील सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप-शिंदे गटात चांगलीच वाजलं आहे. गोरे यांनी, राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत आणि आपल्या नेतृत्वाला माहिती आहे की, कोणाला कधी बरोबर घ्यायचं आणि कधी सोडायचं? यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावरून पलटवार करताना मला ही तसं बोलता येत असा टोला लगावला आहे. तर आमदार संजय शिरसाट यांनी यावर उत्तर देताना, या सरकारचे हायकमांड हे एकनाथ शिंदेच असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिरसाट यांनी फडणवीस आणि अजित पवारांचे हायकमांड शिंदेच आहेत. तर फडणवीस आणि अजित पवार हे त्यांचे समर्थक किंवा सहकारी असल्याचे म्हटल्याने आता नवा वाद सुरू झाला आहे. यावर स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 17, 2023 11:55 AM
ठाकरे गटाचा मोठा निर्णय, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अन् बजोरिया यांना अपात्र करा; विधीमंडळ सचिवांना लिहिलं पत्र
उद्धव ठाकरे यांचं मशाल चिन्ह राहणार की जाणार? सुप्रीम कोर्टात आज फैसला