Lok Sabha Elections : कर्नाटक निवडणूक होताच अजित पवार यांनी कोणते दिले संकेत? भाजपकडून खंडन; काय आहे प्रकरण?
तर लोकसभेच्या 48 आणि विधान सभेच्या 288 जागांच्या बाबतीत जागा वाटपावरून चर्चा झाल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली. त्याच बरोबर राज्यात या निवडणूका एकत्र होतील असं काहींना वाटतयं. त्यामुळे ऐनवेळी धावपळ नको म्हणून त्यावर साधारण चर्चा झाली.
मुंबई | राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होतील असं भाकीत आणि अशी वक्तव्य काही नेते करत आहेत. त्याअनुशगानेच आम्ही महाविकास आघाडीची बैठक बोलावली होती. तर लोकसभेच्या 48 आणि विधान सभेच्या 288 जागांच्या बाबतीत जागा वाटपावरून चर्चा झाल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली. त्याच बरोबर राज्यात या निवडणूका एकत्र होतील असं काहींना वाटतयं. त्यामुळे ऐनवेळी धावपळ नको म्हणून त्यावर साधारण चर्चा झाली. त्यांच्या या माहिती वजा संकेतावरून राज्यात चर्चांना उत आला असतानाच भाजपने मात्र याचे खंडन केलं आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्याला अशी काही शक्यता वाटत नसल्याचे म्हटलं आहे. तसेच त्या का व्हाव्या असा सवाल केला आहे. तर लोकसभेच्या निवडणुकानंतर विधानसभेसाठी 6 ते 7 महिन्याचा कालावधी उरतो त्यामुळे एकत्र कशासाठी असे म्हणालेत.