पुण्यात दाखल झालेल्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले; ‘त्यांना’ स्टेनगन सहित संरक्षण द्या
आपल्याकडून कोणाला राजकीय धोका असू शकतो पण फिजिकली असू शकत नाही असेही ते म्हणाले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी कुणामुळे कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका भाजप पदाधिकाऱ्यांने आपल्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. त्यावरून पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, माझ्याकडून कोणाच्या जीवाला धोका आहे का? असं म्हटलं आहे. त्याचबरोबर आपण कायदा सुव्यवस्था पाळणारे, संविधान पाडणारे आहोत. पण… पण आपल्याकडून कोणाला राजकीय धोका असू शकतो पण फिजिकली असू शकत नाही असेही ते म्हणाले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी कुणामुळे कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं. गरज असेल तर स्टेनगन सहित त्यांना संरक्षण द्या अशी सुचना देखिल केली.