अजित पवार महायुती येत असतील तर त्यांचे… आमचं टार्गेट ‘200’; भाजप प्रवेशावर शिंदे गटाच्या नेत्याची प्रतिक्रीया
भाजपचे नेते आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार हे अजित पवार यांच्याबाबत सातत्याने अशी वक्तव्य करत असतात. तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटनंतर ही शंका अधिकच गडद होत आहे. याचदरम्यान शंभूराज देसाई यांनी यावर वक्तव्ये केलं आहे
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजपचे नेते आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार हे अजित पवार यांच्याबाबत सातत्याने अशी वक्तव्य करत असतात. तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटनंतर ही शंका अधिकच गडद होत आहे. याचदरम्यान शंभूराज देसाई यांनी यावर वक्तव्ये केलं आहे. त्यांनी, त्यांच्यासारखा कोणी महाआघाडीत आला तर त्याचे स्वागत करू असे म्हटलं आहे. महायुती आमची तयारी सुरू आहे. आमचं टार्गेट फिक्स असून आम्हाला 200 जागा जिंकायच्या आहेत. मग त्यासाठी कोणी आम्हाला मदत करणार असेल, अधिक जागा निवडून आणण्यासाठी पाठिंबा देणार असेल, तर आम्ही त्यांचं स्वागतच करू.
Published on: Apr 17, 2023 03:41 PM