कोण कोणाच्या मागं हे शोधण्यापेक्षा…; जयंत पाटील यांचं सरकारला आव्हान

| Updated on: Mar 16, 2023 | 7:25 AM

जर बजेटमध्ये त्यांच्या मागण्यांचा विचार झाला असता, तरतूद झाली असती तर शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला नसता, असा टोला जयंत पाटील यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला आहे.

मुंबई : विधानसभेत अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प केल्यानंतर यावर आता चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील सरकारवर टीका केली. तसेच या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम देखील या सरकारने केलं आहे. जर बजेटमध्ये त्यांच्या मागण्यांचा विचार झाला असता, तरतूद झाली असती तर शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला नसता, असा टोला जयंत पाटील यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला आहे. तसेच जर यामागे कोण आहे? कोणती शक्ती आहे याचा शोध सरकारने घ्यावा. त्यांच्याकडे गृहखाते आहे. पण शोध घेण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यायला हवं.

Published on: Mar 16, 2023 07:25 AM
…तर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंच नसतं; जयंत पाटील यांची सरकारवर टीका
सगळ्या मागण्या मान्य होतीलच असं नाही, पण…; शेतकरी आंदोलनासंदर्भात मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य