Special Report : राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभारत; नरहरी झिरवाळ यांचा दावा अन् शिंदे गटाची धाकधूक वाढली

| Updated on: Jul 11, 2023 | 11:26 AM

शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना नोटीस बजावली आहे. यावरून शिंदे गटाची धाकधूक वाढल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडमोडींना वेग आला आहे. वर्षभरापुर्वी शिवसेनेत बंडखोरी करत सत्तेवर आलेल्या शिंदे गटाच्या बाबतीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना नोटीस बजावली आहे. यावरून शिंदे गटाची धाकधूक वाढल्याचे पहायला मिळत आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवार गट हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाला आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राष्ट्रवादीचे नेते बोलणे टाळत आहेत. मात्र असे असाताना अजित पवार गटाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ याचं महत्त्वाचं विधान समोर आलं आहे. त्यांनी सत्ताधारी शिंदे गटाचे 16 आमदार उद्या अपात्र होणार आहेत. मात्र हा अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. त्यामुळे त्यावर मी जास्त भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असं म्हटलं आहे. त्यावर शिंदे गटाकडून संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 11, 2023 11:26 AM
नाव एकाकडे, पक्ष दुसऱ्याकडे असं होऊ शकतं? उद्धव ठाकरे यांच्या विधानावर कायदेतज्ज्ञ म्हणतात…
सत्ताधाऱ्यांची गाडी सुसाट, ब्रेक लावायला विरोधी पक्षनेताच नाही; पावसाळी अधिवेशन नेत्याविनाच होण्याची शक्यता