अजित पवार गटातील आमदार म्हणतो; ‘मी देखील पवार साहेबांकडे जाणार’

| Updated on: Jul 17, 2023 | 1:55 PM

अजित पवार आणि त्यांच्याबरोबर २५ हून अधिक आमदार यांनी राष्ट्रावादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबर बंडखोरी केली. यानंतर अजित पवार आणि ८ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली.

मुंबई, 17 जुलै 2023 | महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये २ जुलै हा राजकीय भूकंपाचा ठरला. यादिवशी अजित पवार आणि त्यांच्याबरोबर २५ हून अधिक आमदार यांनी राष्ट्रावादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबरोबर बंडखोरी केली. यानंतर अजित पवार आणि ८ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांच धक्का दिला. यावेळी अचानकपणे अजित पवार गट शरद पवारांना भेटीला गेला. ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली. वाय.बी.चव्हाण सेंटरवर अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. ज्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे म्हटलं होतं. तर त्यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवार गटाकडून दिलगिरी व्यक्त करण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याचा दावा केला आहे. यावरून अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी, आपल्याला तसं वाटन नसून ते फक्त शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचं म्हटलं आहे. तर आपण स्वत: शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचे देखील म्हटलं आहे.

Published on: Jul 17, 2023 01:55 PM
बच्चू कडू यांच्या स्मित हास्यामागचं नेमकं कारण काय? पाहा व्हिडीओ…
एनडीएच्या बैठकीला बच्चू कडू जाणार; मांडणार ‘हे’ महत्वाचे मुद्दे