आक्षेपाहार्य व्हिडियो प्रकरण; अंबादास दानवे यांचा घणाघात; ‘सोमय्या यांच्याविरोधात अनेक तक्रारी’
याचदरम्यान सोमय्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सत्यता तपासली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच मी कोणत्याही महिलेचे शोषण केले नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत असेही म्हटलं आहे.
मुंबई, 18 जुलै 2023 | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडालेली आहे. याचदरम्यान सोमय्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सत्यता तपासली पाहिजे अशी मागणी केली आहे. तसेच मी कोणत्याही महिलेचे शोषण केले नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत असेही म्हटलं आहे. त्यावरून आता विरोधकांनी भाजपला धारेवर धरत सडकून टीका केली आहे. याचमुद्द्यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. तर किरीट सोमय्या यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. हा मुद्दा आम्ही योग्य व्यासपीठावर मांडणार असल्याचेही दानवे यांनी म्हटलं आहे. तर तक्रारी करणाऱ्या त्या महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची असल्याचंही त्यांनी यावेळी बोलले आहे.