विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर?

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर?

| Updated on: Jun 13, 2022 | 3:24 PM

विधानपरिषदेची निवडणूक (Legislative elections) ही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. निवडणुकीसाठी फक्त 3 वाजेपर्यंतचाच वेळ शिल्लक असून काँग्रेसकडून किंवा हायकमांडकडून सूचना आल्यास निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडूनही ही निवडणूक बिनविरोध कण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने अर्ज मागे घ्यावा अशी मागणी भाजपाने केल्याचे […]

विधानपरिषदेची निवडणूक (Legislative elections) ही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. निवडणुकीसाठी फक्त 3 वाजेपर्यंतचाच वेळ शिल्लक असून काँग्रेसकडून किंवा हायकमांडकडून सूचना आल्यास निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपाकडूनही ही निवडणूक बिनविरोध कण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने अर्ज मागे घ्यावा अशी मागणी भाजपाने केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सह्यांद्री अतिथी गृहावर घेण्यात येत असल्याचे समजते. दिल्लीमधून सूचना आल्यास काँग्रेस अर्ज मागे घेणार अशी सूत्रांची माहिती आहे. जयंत पाटील, अजित पवार, थोरात, अनिल परब यांच्यासह अनेक नेते सह्यांद्री अथाति ग्रहावर पोहोचल्याचे आपण पाहू शकतो.

उकळते तेल टाकून पत्नीले पतीला संपवलं, चार दिवसांत झाला घटनेचा उलगडा
काँग्रेसकडून एक अर्ज मागे घेतल्या जाण्याची शक्यता!