‘आमचं सरकार येऊ द्या मग बघा’, ठाकरे गटाच्या खासदाराचा भाजपला इशारा
अजित पवार हे सर्वात भ्रष्टाचारी असे बोलताना पंतप्रधानांचा गळा सुकत होता. पण, सत्तेसाठी त्याच अजित पवार यांना सोबत घेतले. कारण हे घाबरलेले लोकं आहेत. येणाऱ्या काळात ते घरी बसणार आहेत. कारण त्यांनी गद्दारी केली आहे
मुंबई : 30 ऑगस्ट 2023 | इंडिया आघाडीची बैठकीची मुंबईत जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, पंतप्रधान पदाचा तुमचा उमेदवार कोण अशी विचारणा भाजपकडून करण्यात येत आहे. त्याला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी उत्तर दिले आहे. आमचा उमेद्रवार कोण हा मुद्दा गौण आहे. पण, देशात पुढचा पंतप्रधान हा इंडिया आघाडीचाच होणार असे त्या म्हणाल्या. देशातील जनतेचा प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे, सिलेंडरचे भाव कमी करायला यांना 9 वर्षे लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा आवाज काय समजणार? ते फक्त मन की बात करतात आणि आम्ही जन की बात करतो. काश्मीरमध्ये हिंदुवर तर उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम यांच्यावर अत्यचार होतो. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. जे गुन्हेगार आहेत, भ्रष्टाचारी आहेत त्यांना सोबत घेत आहात. आमचे सरकार तर येऊ द्या मग बघा काय बदल होतो, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.