Nana Patole | देशातील महागाई, बेरोजगारी कमी होऊ दे, गणेशाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे साकडे
Nana Patole | देशातील महागाई, बेरोजगारी कमी होऊ दे, देशाच्या सीमा सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवांचा देव गणरायाला केली आहे.
Nana Patole | देशातील महागाई (Inflation ), बेरोजगारी कमी होऊ दे, देशाच्या सीमा सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देवांचा देव गणरायाला केली आहे. गणरायाला प्रार्थना (Pray) करताना त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. देशातील सर्वसामान्य नागरीक सध्या महागाईने त्रस्त आहे. त्याची या महागाईतून सूटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच तरुणांच्या हाताला रोजगार नसल्याने ते चिंताग्रस्त आहेत. त्यांच्या हाताला रोजगार मिळू दे. देशाच्या सीमा आज सुरक्षित नसल्याचा आरोप करत त्यांनी या सीमांचं रक्षण करण्याचं साकडे गणरायाला घातले आहे. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असून पुन्हा जगावर कोरोनाचे संकट येऊ न देण्याची प्रार्थना त्यांनी सिद्धविनायक चरणी केली आहे.