Rohit Pawar : त्यांना आरोप करु द्या, योग्य वेळी उत्तर दिले जाईल
आरोपांना उत्तर देत बसलो तर जनतेचे प्रश्न बाजूला राहतील. त्यामुळे याला आपण महत्व देत नसल्याचे पवार यांनी सांगितले आहे. तर रोहित पवार हा विकेट घेणारा नाहीतर षटकार मारणारा आहे. आगामी काळात विकास कामाचा षटकार लगावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई : भाजपाचे (Mohit Kamboj) मोहित कंबोज यांच्याकडून (Rohit Pawar) रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला जात आहे. ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे 200 व्यवसाय उभारण्यात आले आहेत. या स्टार्टअप्ससाठी 2007 ते 2012 या कालावधीत घेण्यात आलेल्या कर्जातून बॅंकेचे 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. असा आरोप त्यांनी ट्विटद्वारे केला आहे. मात्र, त्यांना काय (Accusation) आरोप करायचे ते करु द्या आपण सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेऊन विकास कामांवर लक्ष केंद्रीत करीत आहोत असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिले आहे. शिवाय त्यांच्या आरोपांना उत्तर देत बसलो तर जनतेचे प्रश्न बाजूला राहतील. त्यामुळे याला आपण महत्व देत नसल्याचे पवार यांनी सांगितले आहे. तर रोहित पवार हा विकेट घेणारा नाहीतर षटकार मारणारा आहे. आगामी काळात विकास कामाचा षटकार लगावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट देखील मतदार संघातील विकास कामाबद्दल झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.मोहित कंबोज यांच्याकडून होत असलेल्या आरोपाला आपण महत्व देत नसल्याचेही ते म्हणाले आहेत.