रेल्वे दुर्घटनेनंतर LIC चा मोठी निर्णय; परिपत्रक काढत दिले काय आश्वासन?

| Updated on: Jun 04, 2023 | 11:36 AM

एलआयसी ऑफ इंडियानं रेल्वे अपघातातील बाधित लोकांना मदत करण्यासाठी क्लेमचा त्वरीत निपटारा करत आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे

मुंबई : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मृतांचा आकडा आता वाढला आहे. या अपघातात 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 747 लोक जखमी झाले आहेत. तर 56 जण गंभीर जखमी आहेत. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात दाखल जखमींची भेट घेतली. या दुर्घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. तर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान कार्यालयाकडून 2 लाख आणि रेल्वेकडून 10 लाख अशी मदत घोषीत करण्यात आली आहे. याचदरम्यान आता एलआयसी ऑफ इंडिया देखील या अपघातग्रस्तांसाठी धावून आली आहे. तसेच एलआयसी ऑफ इंडियाकडून पत्रक काढत दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. तर ओडिशा रेल्वे अपघातातील बाधित लोकांना मदत करण्यासाठी क्लेमचा त्वरीत निपटारा करत आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे.

Published on: Jun 04, 2023 11:36 AM
“अनेक वर्षांपासून मुंबई काबीज करण्याची भाजपची इच्छा”, महापालिका निवडणुकीवरून अजित पवारांची टीका
दुसऱ्यांनी माझं वकीलपत्र घेऊ नये, अजित पवार यांचा कुणाला खोचक टोला?