हेचि फल काय मम तपाला, गोपीचंद पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुतीच्या काळात भाजपासाठी शरद पवार यांच्यावर तिखट भाषेत टीका केली होती. महाविकास आघाडीच्या काळात एसटीचा संप घडविण्यात गोपीचंद पडळकर यांनी खासा प्रयत्न केला होता. परंतू आता त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे.
एकीकडे विधानसभेचे बिगुल वाजू लागले असताना विविध पक्षात जागांवाटपावरुन अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. अशात गोपीचंद पडळकर यांना भाजपातील स्थानिक नेत्यांनी विरोध करीत भूमिपूत्राला जत येथून उमेदवारी त्यांनी अशी मागणी केलेली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातून विधानसभेसाठी गोपीचंद पडळकर इच्छुक आहेत मात्र तालुक्यातील स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यांच्या विरोधात नारा दिला आहे. जत येथे आयात केलेला उमेदवार नको स्थानिक नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी करीत भाजपाचे स्थानिक नेते मुंबईत धडकणार आहेत. यापूर्वी या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यानेतृत्वाखाली भाजपाला सोडचिट्टी दिलेले माजी आमदार विलासराव जगताप, तमनगौडा पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पडळकर यांना विरोध केला आहे. विलासराव जगताप यांनी जत येथून लढण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. तमन गौडा, रवी पाटील आणि समर्थकांनी देखील पडळकर यांना विरोध केला आहे. मुळे वंचित मधून लढून नेते झालेल्या गोपीचंद पडळकर यांनी भाजपात जाऊन वारंवार भाजपासाठी शरद पवार यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. महाविकास आघाडीच्या काळात एसटी संप घडविण्यात पडळकर यांचा रोल मोठा होता. तरी त्यांना विरोध होत असल्याने ‘हेचि फल काय मम तपाला’ अशी त्यांची अवस्था झाली आहे.