ठिकाण महत्त्वाचे नाही तुम्ही जे विचार मांडताय ते महत्त्वाचे आहेत- संदीप देशपांडे
बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते पुढे घेऊन जायची क्षमता जर कोणामध्ये असेलतर ती राज ठाकरेच्या मध्ये आहे असे त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई – दसरा मेळावा शिवाजी पार्क होणार आहे. या दसरा मेळाव्याला (Dasara)कोण संबोधित करणार यावरून राजकीय घडामोडीला वेग आला आहे. याबाबत बोलताना मनसेचे संदीप देशपांडे (MNS Sandip Deshpnade)म्हणाले की दसरा मेळावा कुठल्या दिवशी , कुठल्या जागेवर करता याच्यापेक्षा महत्वाचे म्हणजे संबोधित करणारी व्यक्ती काय संबोधित करते. जर आपण पूर्ण देशातली महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली आणि या सगळयात बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते पुढे घेऊन जायची क्षमता जर कोणामध्ये असेलतर ती राज ठाकरेच्या मध्ये आहे असे त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) हे राज ठाकरेंना भेटले होते.मात्र शिंदे साहेबानी आमच्यकडे मदत मागितले नाही. आम्ही काय मदत करायच विषय येत नाही. पण राजसाहेबांना काही विनंती जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी राज साहेबांनी विनंती केलेली आहे. ते निर्णय घेतील.