लोकसभेसाठी इच्छुक अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे आमने-सामने, पाहा काय म्हणाले

| Updated on: Dec 29, 2023 | 9:18 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना दौऱ्यात उपयोगी ठरेल अशा व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन प्रतिस्पर्धी नेते एकाच व्यासपीटावर आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत या व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकसभेसाठी पक्षप्रमुख जो आदेश देतील तो मान्य करण्यात येईल असे दोन्ही नेत्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर | 29 डिसेंबर 2023 : छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोघे इच्छुक असल्याचे पुढे आले आहे. नुकतेच चंद्रकांत खैरे यांनी आपण संभाजीनगरातील पराभवाचा वचपा काढणारच असे म्हटले होते. या दोन्ही नेत्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे लपवून ठेवलेले नाही. आता पक्ष प्रमुख जो निर्णय देतील तो आपण मान्य करू असे दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या व्हॅनिटी व्हॅनचा वापर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यासाठी करणार आहेत.

Published on: Dec 29, 2023 05:45 PM
बच्चू कडू यांनी पवारांना चहापाण्याला बोलवून टायमिंग साधलं ? स्पेशल रिपोर्ट पाहा
..तर ओबीसी समाज सरकारला जगू देणार नाही, काय म्हणाले तायवाडे