भाजपचे टार्गेट बारामती, कर्जत; बावनकुळे यांचा बारामती दौऱ्यावर
बारामती, इंदापूर आणि कर्जत जामखेडमध्ये 52 भाजप शाखांचे उदघाटन हे बावनकुळे करणार आहेत
पुणे : राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचा दौरा करत आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी बावनकुळे हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. तर बारामती, इंदापूर आणि कर्जत जामखेडमध्ये 52 भाजप शाखांचे उदघाटन हे बावनकुळे करणार आहेत. त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजता बावनकुळे यांची इंदापूरात जाहीर सभा होणार आहे. यावरून पवारांच्या बारामतीत आणि रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मतदारसंघावर भाजपचे विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.
Published on: Mar 26, 2023 11:22 AM